|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावात पोलिसांचे शक्तिप्रदर्शन

बेळगावात पोलिसांचे शक्तिप्रदर्शन 

श्री विसर्जन मिरवणुकीसाठी 3 हजार पोलीस तैनात : प्रमुख मार्गावरून पथसंचलन, संवेदनशील भागांवर नजर

प्रतिनिधी/ बेळगाव

गुरुवारी होणाऱया श्री विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमिवर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी शक्तीप्रदर्शन केले. मिरवणूक बंदोबस्तासाठी 3 हजार 181 पोलीस तैनात करण्यात आले असून संवेदनशील भागातील हालचालींवर नजर ठेवण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय राखीव दलाची एक तुकडीही बेळगावात दाखल झाली आहे.

पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी बुधवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मिरवणूक बंदोबस्ताची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. 3 हजार 181 पोलिसांबरोबरच 434 गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या 9, शहर सशस्त्र दलाच्या 5 व केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

मिरवणुकीदरम्यान स्फोटकांची तपासणी करण्यासाठी तीन स्वतंत्र पथके, श्वान पथक तैनात करण्यात येणार आहे. बुधवारी पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, उपायुक्त सीमा लाटकर आदी वरि÷ अधिकाऱयांनी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या व त्यांना मार्गदर्शनही केले.

मंगळवारचा मोहरम शांततेत पार पाडल्यानंतर आता पोलीस अधिकाऱयांनी श्री विसर्जन मिरवणुकीकडे आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. भयमुक्त व उत्साहपूर्ण वातावरणात ही मिरवणूक व्हावी, यासाठी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी शक्तिप्रदर्शन केले. चन्नम्मा सर्कलपासून शहरातील प्रमुख मार्गावरून पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात नागरी पोलीस, शहर सशस्त्र दल, राज्य राखीव दलाबरोबरच निमलष्करी दलाच्या जवानांनीही भाग घेतला होता.

समाजकंटकांच्या कारवायांवरही पोलिसांची नजर

संवेदनशील भाग मिरवणूक मार्ग, प्रार्थनास्थळे व वर्दळीच्या ठिकाणांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. समाजकंटकांच्या कारवायांवरही पोलिसांची नजर असून यासाठी शहरात 258 अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सध्या ट्रफिक मॅनेजमेंट सेंटरसाठी असलेल्या 152 कॅमेऱयांचाही वापर या काळात होणार आहे.

आठ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी 6 पासून शुक्रवारी 13 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 पर्यंत संपूर्ण शहर परिसरात मद्य विक्री बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस यंत्रणाही कार्यरत असणार आहे. गणेश भक्तांसाठी शहरातील आठ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगावकरांनी पोलीस प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. 

Related posts: