|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » उदयनराजेंचा भाजपप्रवेश नक्की

उदयनराजेंचा भाजपप्रवेश नक्की 

ऑनलाईन टीम / सातारा : 

साताऱयाचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश नक्की झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत ते शनिवारी पक्षप्रवेश करणार असल्याचे समजते. पुण्यात शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबद्दल बातम्या प्रसिद्ध होत होत्या. मात्र, उदयनराजे भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीतच राहणार, याबाबतचा संभ्रम कायम होता. मात्र, आज त्यांचा भाजप प्रवेश नक्की झाल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितील दिल्लीत ते भाजपात प्रवेश करणार, हे निश्चित झाले आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून ते खासदारकीचा राजीनामा आहेत.

उदयनराजे यांनी गुरुवारी पुण्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत दोघांत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील उपलब्ध झाला नाही. मात्र, या भेटीनंतर उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. तथापि, उदयनराजेंच्या समर्थकांनी मात्र त्यांचा भाजपप्रवेश निश्चित झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पवार यांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंनी आपला मार्ग धरल्याचे बोलले जात आहे. रविवारी साताऱयात येणाऱया महाजनादेश यात्रेत ते आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी होतील, असेही सांगितले जात आहे.