|Thursday, February 27, 2020
You are here: Home » उद्योग » ऍमेझॉनचे भारतात व्यवसाय वृद्धीचे ध्येय

ऍमेझॉनचे भारतात व्यवसाय वृद्धीचे ध्येय 

वृत्तसंस्था /हैदरबाद :

ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉनने आपली जगातील सर्वात मोठी इमारत भारतामध्ये हैदराबाद येथे नुकतीच उभारली आहे. यांचा विस्तार 282 फूट लांब असून इमारतीला 49 एलिवेटर लावण्यात आले आहेत. यांच्या आधारे काही सेकंदात कर्मचारी दुसऱया मजल्यावर पोहोचण्यास मदत होणार आहे. हैदराबादमधील कार्यालयात सध्या 15 हजार कर्मचारी असून त्यांना आरोग्य,मनोरंजनासह अन्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सर्व सुविधाचा उद्देश देशातील ई-कॉमर्स बाजार आगामी ाढाळात 100 अब्ज डॉलरच्या घरात नेण्याचे ध्येय असल्याचे कंपनीने यावेळी सांगितले आहे.

वॉलमार्टसोबत स्पर्धा

वॉलमार्टने मागील वर्षात फ्लिपकार्टची 77 टक्क्यांची हिस्सेदारी 16 अब्ज डॉलर्सला खरेदी केली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना आपली सेवा देत आहेत. देशात 62 हजार कायमचे कर्मचारी व 1.55 लाख कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर लवकरच व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न ऍमेझॉनकडून करण्यात येणार असल्याचे ऍमेझॉनचे एचआर संचालक दीप्ती वर्मा यांनी म्हटले आहे.

2022 पर्यंतचे ध्येय

देशातील ई-कॉमर्सचा विस्तार 2022 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सच्या घरात नेण्याचे अनुमान ऍमेझॉनने नोंदवले आहे. कारण देशात ऍमेझॉन आणि वॉलमार्ट सोबत भारताची रिलायन्स कंपनी या ऑनलाईन बाजारात उतरणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा अधिकच अटीतटीची होणार असल्याचे ऑनलाईन बाजारातील अभ्यासकांचे मत व्यक्त केली जात आहेत.

 

 

Related posts: