|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » -सय्यद कादी यांच्या चौथ्या पुस्तकाच प्रकाशन

-सय्यद कादी यांच्या चौथ्या पुस्तकाच प्रकाशन 

प्रतिनिधी /पणजी :

सय्यद मंझूर कादी यांच्या चौथ्या ‘मास्टर की फॉर हय़ुमानिटी’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या शनिवार 14 सप्टेंबर रोजी पणजीत होणार आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन टाईम्स ऑफ इंडियाचे गोव्याचे निवासी संपादक राजेश मेनन यांच्या हस्ते होणार असून सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक दिलीप बोरकर, इतिहास संशोधक प्रजल साखळदांडे, पत्रकार प्रकाश कामत, प्रो. एडविन कोर्टेज व अखिल गोवा मुस्लिम समाज संस्थेचे अध्यक्ष हाजी शेख बशिर अहमद विशेष निमंत्रीत म्हणून उपस्थित रहाणार आहेत. सदर कार्यक्रम येथील हॉटेल फिडाल्गो पणजी येथे शनिवारी 14 रोजी स. 11 वा. होईल. सर्वांनी कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लेखक सय्यद मंझूर कादी यांनी केले आहे.