|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » सेंट अँड्रय़ुज कॉलेजकडून भौतिकोपचार शिबिर

सेंट अँड्रय़ुज कॉलेजकडून भौतिकोपचार शिबिर 

पुणे /प्रतिनिधी : 

जागतिक भौतिकोपचारदिनाचे औचित्य साधून येथील सेंट अँड्रय़ुज कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने मोफत आरोग्य चिकित्सा व तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भौतिकोपचार पद्धतीची ज्या रुग्णांना गरज आहे अशा 100 हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी भौतिकोपचारामधील तज्ञ डॉ. ज्योत्स्ना मंगेश नारगोडा उपस्थित होत्या. त्यांनी भौतिकोपचार क्षेत्रातील आपले अनुभव विद्यार्थ्यांना कथन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अलंबिन जेरोम यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. शिबिरात संस्थेच्या संचालिका डॉ. जेसीनथा पिलाई, संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर सर, डॉ. इंद्रा मॅडम, राजेश पिलाई आदी मान्यवर उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. गौराई घरोटे, डॉ. श्वेता कुलकर्णी, डॉ. तेजल परदेशी, डॉ. ऋतुजा जाधव, डॉ. नेहा हटवार यांनी विशेष परिश्रम घेतले.