|Thursday, February 27, 2020
You are here: Home » उद्योग » हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी वेब पोर्टलची निर्मिती

हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी वेब पोर्टलची निर्मिती 

दूरसंचार विभागाकडून तयार केली योजना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तंत्रज्ञानाच्या जोरावर निर्माण करण्यात आलेल्या गोष्टी वापरण्यास सोप्या आहेत. तितक्या त्या सांभाळणे ही जोखमीचे होत असल्याचे पहावयास मिळत आहे. मोबाईल फोन अनेकजण घाईगडबडीत विसरणे, चोरी होणे किंवा अन्य कोणत्याही मार्गानी मोबाईल गहाळ होतो. परंतु यांचा शोध घेण्यासाठी सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एका वेब पोर्टलची निर्मिती करण्यात आली असून त्यांचे सादरीकरण महाराष्ट्रात करण्यात येणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.

आपला फोन हरवल्यानंतर आपण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करावा किंवा हेल्पलाईन नंबर 14422 या नंबरच्या आधारे दूरसंचार विभागाला माहिती कळवणे आवश्यक आहे. त्यानंतर आयएमइआय नंबर बंद केला जाईल व नेटवर्क वापरात येणार नाही. त्यामुळे मोबाईलचा शोध लवकरच घेता येणार असल्याचे म्हटले आहे.

 सीइआयआर उपकरण

दूरसंचार विभागाकडून जुलै 2017 मध्ये सी-डीओटी मोबाईल ट्रकिंग प्रकल्प ‘सेन्ट्रल इक्विपमेन्ट आयडेटिटी रजिस्टर(सीइआयआर)’ निर्मिती करण्यात आली आहे. हे उपकरण आयएमइआय नंबरचा एक डाटाबेस योजना असून यांचा उद्देश हरवलेले मोबाईल फोन, चोरी फसवणूक आदी गोष्टींना आळा घाण्यासाठी यांचा वापर केला जातो. यासाठी अंदाजे 15 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव निश्चित करण्यात आला होता.

अन्य सुविधा

w सिमकार्ड बदलले तरी मोबाईलचा शोध घेणार

w मोबाईल ऑपेरटर्सना आयएमइआयला डाटाबेस कनेक्ट

w सेन्ट्रल सिस्टम पद्धतीने काम करणार

wकोणत्याही नेटवर्क, ब्लॅकलिस्ट व अन्य डिव्हाइस असले तरी काम करणार

Related posts: