|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » उदयनराजेंच्या बालीश चाळ्यांना पवारांनी पाठीशी घातले : आव्हाड

उदयनराजेंच्या बालीश चाळ्यांना पवारांनी पाठीशी घातले : आव्हाड 

ऑनलाईन टीम / मुंबई :

साताऱयाचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.

‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे यांच्यावर मनापासून प्रेम केले. त्यांची प्रत्येक चूक त्यांनी सांभाळून घेत बालीश चाळ्यांना पाठिशी घातले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना साताऱयातील आमदारांचा विरोध होता. तरी देखील शरद पवारांनी उदयनराजेंसाठी त्यांच्या जवळच्या लोकांना दुखावून उदयनराजेंना तिकीट दिले. शेवटी त्यांच्या वाटय़ाला दुःखच आले. मी जर उदयनराजेंसारखा वागलो असतो तर माझी केव्हाच पक्षातून हकालपट्टी केली असती,’ असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

Related posts: