|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Top News » इंदूरीकरांचे राजकीय आख्यान

इंदूरीकरांचे राजकीय आख्यान 

ऑनलाईन टीम / नगर : 

प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराज राजकारणात येण्याची शक्यता आहे. काल भाजपच्या महाजनादेश यात्रेत ते थेट व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसले. त्यामुळे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते भाजपात प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आले आहे.

भाजपही इंदूरीकर महाराजांना संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. संगमनेर हा थोरात यांचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे इंदूरीकर महाराज थोरातांसमोर मोठे आव्हान उभे करु शकतात. काल मुख्यमंत्री आणि इंदूरीकर महाराज यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र, कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दल माहिती मिळू शकली नाही. इंदूरीकर महाराजांकडूनही अद्याप भाजप प्रवेश अथवा संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रीया आली नाही.

Related posts: