|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उजनी धरणातून होणाऱया विसर्गात वाढ

उजनी धरणातून होणाऱया विसर्गात वाढ 

वार्ताहर / बेंबळे

मागील आठवडय़ात जोरदार पाऊस झाल्याने दौंडची आवक वाढल्याने भीमेत सतत पाण्याचा विसर्ग होत होता. मागील चार दिवसात उजनी धरणात येणाऱया पाण्याची आवक मंदावल्याने भीमेत सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले होते. मात्र गुरूवारी रात्रीपासून भीमा खोऱयासह घाटमाथ्यावर पावसाने हजेरी लावल्याने उजनीतून 20 हजार क्युसेकने सांडवा, तर 1,600 क्युसेक पाणी वीज निर्मितीसाठी सोडण्यास शुक्रवारी सकाळी सुरूवात झाली होती नंतर हा विसर्ग शनिवारी 40 हजार क्युसेक करण्यात आला होता.

पुणे जिह्यातील 19 पैकी 15 धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. गुरुवारपासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने पुणे जिह्यातील 16 धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजल्यापासून खडकवासला धरणातून पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. धरणक्षेत्रात गुरुवार पासून शुक्रवारपर्यंत पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत होत्या. शनिवारी सकाळी सहापर्यंत पिंपळगाव जोगे 6, माणिकडोह 5, कळमोडी 29, चासकमान 20, भामाआसखेड 12, वडिवळे 30, आंद्रा 23, पवना 16, कासारसाई 02, मुळशी 19, टेमघर 25, वरसगाव 13, पानशेत 15,  आणि खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात 7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाळ्यात उजनी जलाशयात केवळ 155 मि. मी इतकी निचांकी नोंद आहे.

भिमा खोऱयातील धरणांपैकी पिंपळगाव जोगे, माणिकडोह, विसापुर आणि येडगाव वगळता सर्वधरणे भरलेली आहेत. बंडगार्डन विसर्ग 17,472 क्युसेक  तर दौंडमधून 36,523 क्युसेकची आवक उजनी धरणात येत असल्याने उजनी धरणातून आज 15 रोजी भिमेत सकाळी 45 हजार, दुपारी 60 हजार क्युसेकचा  तर सायं 6 वा. 70 हजार असा टप्पा टप्प्याने वाढ करत भिमा पात्रात सोडण्यात येत आहे.

दरम्यान निरा खोऱयात पावसाने विसावा घेतल्याने वीर धरणातून निरेत होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. भिमाच्या उपनद्यांवरील या प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे.

उजनीत होणारी पाण्याची आवक

वडज 832 क्युसेक

डिंभे 5,040 क्युसेक

घोड 7,800 क्युसेक

कळमोडी 1,092 क्युसेक

चासकमान 2,770 क्युसेक

भामा आसखेड 5,410 क्युसेक

वडीवले 688 क्युसेक

आंध्र 4,610 क्युसेक

मुळशी 10,260 क्युसेक

टेमघर 911 क्युसेक

वरसगाव 888 क्युसेक

पानशेत 2,931 क्युसेक

खडकवासला 1,712 क्युसेक

 

सध्या उजनी धरणातील  पाणीपातळी

15 सप्टेंबर 2019, सांय 06.00 वा.

एकूण पाणीपातळी –   497.220   मीटर

एकूण पाणीसाठा  –   3452.95  दलघमी

उपयुक्त  साठा   –   1650.14 दलघमी

एकुण पाणीसाठा  –   121.93 टी.एम.सी.

उपयुक्त साठा    –   58.27 टी.एम.सी.

टक्केवारी       –   108.76 टक्के

दौंड विसर्ग      –   36,523 क्यूसेक

Related posts: