|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर फेकल्या कडकनाथ कोंबडय़ा

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर फेकल्या कडकनाथ कोंबडय़ा 

ऑनलाइन टीम /इस्लामपूर : 

कडकनाथ घोटाळा आता मुख्यंमंत्र्यांपर्यंत पोहचला आहे. सोमवारी इस्लामपूर-सांगली रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबडय़ा फेकल्या आहेत. कडकनाथ कोंबडय़ांच्या माध्यमातून शेतकऱयांची फसवणूक करणाऱयांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचा ताफा इस्लामपूर-सांगली रस्त्यावरून जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घोषणा देत व कोंबडय़ा नाचवतच रस्त्यावर उतरले. दरम्यान, कडकनाथ कोंबडी प्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. ईडीमार्फत चौकशी न केल्यास ईडी कार्यलयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढण्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे. याचेच पडसाद मुख्यमंत्र्यांची यात्रा सांगली येथे पोहचली असता पाहायला मिळाले.

 

Related posts: