|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » संजय लीला भन्साळींची मोदींना वाढदिवसाची अनोखी भेट

संजय लीला भन्साळींची मोदींना वाढदिवसाची अनोखी भेट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी त्यांना एक अनोखी भेट देणार आहेत.

मोदींच्या संपूर्ण आयुष्यावर आधारित ‘मन बैरागी’ या चित्रपटाची निर्मिती भन्साळी आणि महावीर जैन करत आहेत. संजय त्रिपाठी या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज सुपरस्टार प्रभासच्या हस्ते लाँच होणार आहे.

जी व्यक्ती स्वतःला शोधण्यासाठी निघाली आणि देशातील सर्वात मोठा नेता झाली, अशा या व्यक्तीच्या जीवनपटाचे लेखन संजय त्रिपाठी यांनी केले आहे. नरेंद्र मोदींचा जीवन प्रवास या चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न संजय लीला भन्साळी यांनी केला आहे.

Related posts: