|Sunday, December 8, 2019
You are here: Home » उद्योग » ऍपल भारतात व्यवसाय वृद्धीच्या तयारीत

ऍपल भारतात व्यवसाय वृद्धीच्या तयारीत 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली  :

जगभरात कार्यरत असणाऱया इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या भारतीय बाजारात मोठय़ा प्रमाणात व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखत आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध आयफोन निर्मितीमधील ऍपल कंपनी देशात व्यवसाय  विस्तार करण्याची योजना उभारत आहे. अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.

भारतामध्ये उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून विकास करण्याची प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये आगामी दोन ते तीन महिन्यात योग्य पावले उचलण्यात येणार आहेत. ऍपल सध्या देशातच तैवानची विस्ट्रॉन कंपनीकडून कंत्राटी पद्धतीवर आयफोन-6एस व 7 यांचे उत्पान करीत आहे.

 

 

 

 

Related posts: