|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागा लढविणार : अभिजीत बिचुकले

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागा लढविणार : अभिजीत बिचुकले 

पुणे / प्रतिनिधी : 
महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांच्या प्रदेशात आज या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांची अवस्था, उद्योजकांची अवस्था किती चांगली? आणि किती वाईट? आहे याची संपूर्ण जाणीव महाराष्ट्रातील तमाम जनतेला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी अभिजीत वामनराव आवाडे बिचुकले एक स्वतंत्र पक्ष अखिल बहुजन समाज सेना हा घेऊन येतोय.
मी माझ्या पक्षातर्फे आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये २८८  जागा लढवणार आहे. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम समाजसेवी कार्यकर्त्यांना, लोकनेत्यांना व होतकरूंना आणि सर्व पक्षांमध्ये कित्येक वर्षे एकनिष्ठ काम करून त्याठिकाणी आपला शिक्का जमून सुद्धा पक्षश्रेष्ठींनी डावललेल्या सर्व लोकांना पक्षांमध्ये सामील होण्याचे आव्हान अभिजित बीचुकले यांनी केले आहे.
बिग बॉस या रियालिटी शो मधून घराघरांमध्ये मी पोचलो आहे मी किती खरा माणूस आहे हे महाराष्ट्रातील  जनतेने पाहिले आहे. लहानपणापासून मुख्यमंत्री होण्याच एक स्वप्न उराशी बाळगलेला आहे. यामागे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील समविचारी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे तसेच अखिल बहुजन समाज सेना पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन अभिजीत बिचुकले यांनी केले आहे. 

Related posts: