|Sunday, November 17, 2019
You are here: Home » क्रिडा » निक किर्गीओस पराभूत

निक किर्गीओस पराभूत 

वृत्तसंस्था/ झुहाई, चीन

अनेकदा वादग्रस्त वर्तन करणारा ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक किर्गीओसने झुहाई चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा अंडरआर्म सर्व्हिस केली. पण शेवटी त्याला पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले.

24 वर्षीय निकने इटलीच्या आंद्रेयास सेपीवर पहिल्या सेटमध्ये 4-1 अशी भक्कम आघाडी घेतली होती. पण शेवटी त्याला 7-7 (7-5), 6-1 असा पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सेटवेळी 3-1 आणि 40-0 असे आघाडीवर असताना त्याने सर्व्हिस केली. पण चेंडू नेटला लागला. पण नंतर त्याने 4-1 अशी बढत घेतली. त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याने नंतर त्याचा खेळ घसरला आणि सेपीने त्याला डोके वर काढू न देता विजय मिळवित दुसरी फेरी गाठली.

Related posts: