|Saturday, February 22, 2020
You are here: Home » क्रिडा » रोमांचक सामन्यात बंगाल वॉरियर्सची तेलुगु टायटन्सवर मात

रोमांचक सामन्यात बंगाल वॉरियर्सची तेलुगु टायटन्सवर मात 

वृत्तसंस्था/ जयपूर

येथे सुरु असलेल्या प्रो कबड्डी लीगमधील बुधवारी झालेल्या रोमांचक सामन्यात बंगाल वॉरियर्सने तेलुगु टायटन्सवर 40-39 असा निसटता विजय मिळवला. या विजयासह गुणतालिकेत बंगाल संघाने 73 गुणासह अग्रस्थान कायम राखले आहे. बंगालकडून मनिंदर सिंगने सर्वाधिक 17 गुणाची कमाई करत विजयात मोलाची भूमिका बजावली. सुकेश हेगडे (5 गुण) व बलदेव सिंग (3 गुण) मिळवत मनिंदर सिंगला चांगली साथ दिली. याउलट तेलुगु टायटन्सकडून सिद्धार्थ देसाई (15 गुण) वगळता इतर खेळाडूंनी निराशा केली. पहिल्या सत्रात बंगालच्या खेळाडूंनी निराशा केली मात्र दुसऱया सत्रात शानदार खेळाचे प्रदर्शन करत विजय खेचून आणला. आता, गुणतालिकेत टायटन्स संघ 34 गुणासह अकराव्या स्थानी असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान देखील संपल्यात जमा आहे.

Related posts: