|Friday, October 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘वन्स अ ईअर’मध्ये निपुणचे सहा वेगळे लुक्स

‘वन्स अ ईअर’मध्ये निपुणचे सहा वेगळे लुक्स 

एमएक्स प्लेयरवर मंदार कुरुंदकर दिग्दर्शित ‘वन्स अ ईअर’ ही मराठी ओरिजनल्स वेबसीरिज सुरू झाली आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसादही मिळत आहे. निपुण धर्माधिकारी आणि मफण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असणाऱया या वेबसीरिजमध्ये त्यांच्या सहा वर्षांच्या नात्यात प्रत्येक टप्प्यावर आलेले वेगळे वळण दाखवण्यात आले आहे. बराच काळ अभिनयापासून दूर राहिलेला निपुण या वेबसीरिजच्या निमित्ताने आपल्या समोर येत आहे. यात निपुणचा 18 ते 23 वर्षांपर्यंचा प्रवास दाखवला असून, त्याचे सहा वेगळे लुक्स यात पाहायला मिळत आहेत.

या लुक्सबाबतचाच एक मजेदार किस्सा निपुणने शेअर केला आहे. तो म्हणतो, या सहा वर्षांच्या कालावधीत माझे सहा वेगळे लुक्स दाखवण्यात आले आहेत. शिवाय ते नैसर्गिक दिसणेही तितकेच महत्त्वाचे होते. त्यामुळे शुटिंगचे शेडय़ुलही तसेच केले होते. आधी दाढी, मग मिशी आणि शेवटी तुकतुकीत दाढी (क्लीन शेव्ह) अशा क्रमाने चित्रीकरण करण्यात आले. ज्यावेळी माझा शेवटचा लुक केला तेव्हा मी स्वत:ला बघून घाबरलोच. कारण बऱयाच काळात मी स्वत:ला असे बघितले नव्हते. त्यामुळे मलाच एक भीती होती, मी क्रीनवर कसा दिसेन? मात्र, मंदारला माझा हाच लुक हवा होता. या भूमिकेसाठी मी वजनही कमी केले. विशेष म्हणजे या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मी एकदाही वजन तपासले नाही. माझे आठ-दहा वर्षांपूर्वीचे काही कपडे मी ठेवले होते. जे मला आता यायला लागले, यावरून मला कळले की माझे वजन कमी झाले आणि आवर्जून सांगावी अशी एक गोष्ट म्हणजे या काळात मला हे सुद्धा नव्याने कळले की माझ्या बायकोला डाएटचे पदार्थ इतके छान बनावता येतात. सहा भागांची ‘वन्स अ ईअर’ ही वेबसीरिज एमएक्स प्लेयरवर विनामूल्य पाहता येईल.