|Sunday, December 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » झेब्रा एंटरटेन्मेंट करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

झेब्रा एंटरटेन्मेंट करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण 

ऑनलाईन टीम / पुणे :

वेगवेगळय़ा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकलेल्या ‘उतरंड’ ह्या लघुपटाचे निर्माते आता लवकरच मराठी सिनेसृष्टीत एक धमाल विनोदी कमर्शिअल सिनेमा घेऊन येत आहेत. झेब्रा एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेने पर्यावरणाचे महत्त्व पटवून एक समाजप्रबोधनपर उतरंड या लघुपटाची निर्मिती 2016 ला केली होती. त्यांच्या या लघुपटाला गेल्या दोन वर्षात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधे पुरस्कार मिळाले. आता झेब्रा एंटरटेन्मेंट लाइट हार्टेड कॉमेडी मराठी सिनेमा घेऊन येणार आहे.

या विषयी झेब्रा एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाउसचे निर्माते संजय गोळपकर म्हणतात, आम्ही आमच्या निर्मिती संस्थेच्या स्थापनेनंतर उतरंड या लघुपटाची निर्मिती केली. उतरंडला विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाल्याने आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहोत. पदार्पणात एक निखळ मनोरंजनपर सिनेमा घेऊन येत आहोत.

संगीत दिग्दर्शक आणि गीतकार गणेश-सुरेश ह्या जोडीने उतरंड सिनेमाचे दिग्दर्शन केले. त्यांनीच आमच्या नव्या सिनेमाची कथा लिहिली आहे. लवकरच या सिनेमाचे नाव आणि स्टारकास्टची आम्ही घोषणा करू. हा चित्रपट तुम्ही आपल्या संपूर्ण कुटूंबासोबत एकत्र बसून पाहू शकाल, असा विनोदी सिनेमा आहे. याची मी ग्वाही देतो.

झेब्रा एंटरटेन्मेंट लवकरच आपल्या सिनेमाचे चित्रीकरण सुरू करणार असून, 2020 च्या सुरूवातीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Related posts: