|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » इन्सुलीत ट्रक कलंडून अपघात

इन्सुलीत ट्रक कलंडून अपघात 

प्रतिनिधी / बांदा:

मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱया ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यालगतच्या झाडीत जाऊन अपघात झाला. हा अपघात पहाटेच्या सुमारास इन्सुली-खामदेव नाकानजीक घडला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातात ट्रकच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. या अपघाताची बांदा पोलिसात नोंद नव्हती. ट्रक मुंबईहून गोव्यात जात होता. पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक रस्त्यालगत गटारात जाऊन कलंडला. सुदैवाने ट्रक खाली न कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.

Related posts: