|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुहागरमध्ये सात वर्षीय बालिकेवर लैगिक अत्याचार; 40 वर्षीय आरोपीला अटक

गुहागरमध्ये सात वर्षीय बालिकेवर लैगिक अत्याचार; 40 वर्षीय आरोपीला अटक 

गुहागर प्रतिनिधी

गुहागर तालुक्यातील एका गावात सात वर्षे बालिकेला आपण गुरे बांधण्याच्या ठिकाणी काठी शोधावयास जाऊया असे सांगून 40 वर्षीय व्यक्तीने या बालिकेवर लैगिक अत्याचार केले. याप्रकरणी गुहागर पोलीसांनी प्रकाश शंकर वाघे (वय 40) याला अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, पिडित बालिका आपल्या घरी एकटीच होती. तिची आई जंगलामध्ये लाकडे गोळा करायला गेली असता हा प्रकार घडला. घरी आल्यावर आपली मुलगी रडत असल्याने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी तिच्या आईने गुहागर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रकाश वाघे याला अटक केली. वाघेवर 376 (3) अ ब, पोक्सो 4 7 8 11 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts: