|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » चंगळवाद म्हणजे जीवन नाही ; जीवनात शिस्त महत्वाची

चंगळवाद म्हणजे जीवन नाही ; जीवनात शिस्त महत्वाची 

पुणे / प्रतिनिधी : 

स्त्री ही संपूर्ण घराची काळजी आणि जबाबदारी घेत असते. तिच्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी असतो. आज नोकरी करून घर सांभाळणाºया अनेक महिला आहेत. त्यांचा आदर्श आणि शिस्त समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे आजच्या तरुण-तरुणींनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, चंगळवाद म्हणजे जीवन नाही. जीवनात शिस्त ही अत्यंत महत्वाची आहे, असे मत माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले. 

श्री भवानी प्रतिष्ठान व परिवर्तन ट्रस्टच्यावतीने स्त्री शक्ती सन्मान जागर सोहळया आयोजन टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी पंडित वसंतराव गाडगीळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर, समीर देसाई, संतोष फुटक, अरविंद जडे, आदी मान्यवर उपस्थित होते. 
कार्यक्रमात रोहिणी म्हैसेकर, दिपाली देशमुख, रेखा बर्गे, अनिता डोईफोडे, रंजना सांकला, अनु राठी, मनिषा जोशी, कोमल मुर्ती, वृषाली कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रेडीओलॉजीस्ट डॉ. देवरती खुर्जेकर, पुणे महानगरपालिकेच्या रेडीओलॉजीस्ट डॉ. विद्या गायकवाड यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. 
 
सन्मानाला उत्तर देताना डॉ. विद्या गायकवाड म्हणाल्या, आज मी फक्त माझ्या कुटुंबातील माणसांमुळे पुढे येवू शकले. मी शिक्षण घेत असताना माझे शिक्षण सुरळीत व्हावे, यासाठी ते कष्ट करीत होते. या जबाबदारीची जाणीव ठेवून आज मोठ्या पदावर काम करीत असले तरी माझ्याकडे येणाºया रुग्णांची मी नेहमी चौकशी करते. अनेकदा माझ्याकडे येणाºया रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे त्यांना माझ्याकडून जी मदत होईल ती मी नेहमी करते, असे ही त्यांनी सांगितले. 

Related posts: