|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » leadingnews » महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध : बेरोजगार तरुणांना 5 हजार रुपये भत्ता

महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध : बेरोजगार तरुणांना 5 हजार रुपये भत्ता 

 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

विधनसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपला शपथनामा अर्थात जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात उद्योग, शेती, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरण या सात मुद्यांवर भर देण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, अनिल गोटे, एकनाथ गायकवाड उपस्थित होते.

राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱयांना स्वतंत्र कृषी बजेट, संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगार तरुणांना 5 हजार रुपये बेरोजगारी भत्ता, आशा वर्करला कायम सेवेत सामावून घेणार, सर्व विना अनुदानित शाळा अनुदानित करणार, आरोग्याचा दर्जा सुधरण्यासाठी जिल्हा रुग्णालय अधिक आधुनिक बनवणार, अशी आश्वासने या जाहिरनाम्यातून देण्यात आली आहे. तसेच कामगारांना किमान वेतन 21 हजार करणार, केजी टू पीजी मोफत शिक्षण, उच्च शिक्षणासाठी शून्य टक्क्यांनी कर्ज, सर्व महापालिकांमध्ये 500 फुटापर्यंत मालमत्ता कर माफ, 80 टक्के भूमिपूत्रांना नोकऱया, निम अंतर्गत घेतलेल्या कामगारांना कायम करणार, बचत गटांना 2 हजार कोटी अर्थ साहाय्य, खासगी सावकारांकडे जप्त जमिनी शेतकऱयांना परत करणार असल्याचे आश्वासन शपथपत्रातून देण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 131 जागा तर काँग्रेस आणि मित्र 157 जागा लढणार आहे. लोकसंग्रामचे नेते अनिल गोटे हे आघाडीकडून धुळे मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.