|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » पुण्यात राज‘गर्जना’ होणारच…!

पुण्यात राज‘गर्जना’ होणारच…! 

पुणे / प्रतिनिधी : 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी अखेर मैदान उपलब्ध झाले आहे. नातूबागेतील सरस्वती विद्या मंदिराच्या प्रांगणात येत्या 9 ऑक्टोबरला राज यांची सभा होणार असून, पुण्यात खऱया अर्थाने मनसेची मुलुखमैदान तोफ धडधडणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनसे ताकदीने मैदानात उतरली असून, पुण्यातील विविध मतदारसंघांमध्ये मनसेने आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र, शहरातील शैक्षणिक संस्थांनी राज यांना आपले मैदान सभेसाठी देण्याचे नाकारले होते. त्यामुळे मनसैनिक जागेची शोधाशोध करत होते. मनसेने पोलीस आयुक्तांना पत्र लिहित अलका चौकात सभा घेण्याचीही परवानगी मागितली होती. अखेर राज ठाकरे यांच्या सभेसाठी मैदान मिळाले असून नातू बागेतील सरस्वती विद्या मंदिराच्या प्रांगणात 9 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता ठाकरे यांची सभा होणार आहे. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी ही माहिती दिली.

राज यांच्या भूमिकेबाबत औत्सुक्य

राज ठाकरे विधानसभेत जोरकसपणे उतरण्याच्या तयारीत आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना उतरवले आहे. या मतदारसंघात मनसेचीही चांगली ताकद असून, पक्षाचे किशोर शिंदे रिंगणात आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीनेही शिंदे यांना पाठिंबा दिला असून, पाटील यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Related posts: