|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ातील 101 बूथवर राहणार पोलीसांचा वॉच!

जिल्हय़ातील 101 बूथवर राहणार पोलीसांचा वॉच! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

राज्य विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. शांतातपुर्ण वातावरणात निवडणूक होण्यासाठी बाहेरच्या जिल्हय़ातून 5 सुरक्षा पथके मंगळवारी रत्नागिरीत दाखल होणार आहेत. तसेच जिल्हय़ातील 101 बूथवर पोलीसांचा विशेष वॉच राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.

विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून नियोजन करण्यात आले आहे.  आतापर्यंत निवडणुकीसंदर्भात कोणतीही तक्रार पोलीस दलाकडे आलेली नाही तरीदेखील पोलीस दलाने काही विशेष 101 बूथवर लक्ष ठेवणार आहे. संवेदनशील असे कोणतेही मतदान केंद्र नसले तरी पोलीसांकडून पूर्व खबरदारी म्हणून योग्य नायेजन करण्यात आल्याचेही डॉ. मुंढे यांनी सांगितले.

सध्या पोलीस स्टेशन स्तरावरून सुरक्षेच्या दृष्टीने विविध मतदान केंद्रांना भेटी देण्याचे काम सुरू आहे. जिल्हा पोलीस दलाचे 62 सेक्टर असून याठिकाणी पेट्रोलिंग होणार आहे.

उमेदवारांसोबत घेणार बैठक

  जिल्हय़ातील सर्व उमेदवारांची बैठक पोलीसांकडून आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी सर्व उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे आवाहन करण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांकडून चांगले सहकार्य मिळत असल्याचे डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

Related posts: