|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांची अकरा जणांशी लढत

कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांची अकरा जणांशी लढत 

ऑनलाईन टीम / पुणे :

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघातून 10 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे पाटील यांची मनसेचे ऍड. किशोर शिंदे यांच्यासह अकरा जणांबरोबर अंतिम लढत होणार आहे.

भाजपने कोथरुडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिले आहे. त्यामध्ये कोथरुडकरांनीही आपली नाराजी सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावून दाखवून दिली. कोथरुड करांना स्थानिक आमदार हवा आहे. त्यासाठी पाटील यांनी कोथरुडमध्ये भाडय़ाने घर घेतले आहे.

या कोथरुड मतदारसंघातून 25 जणांनी 33 अर्ज दाखल केले होते. त्यामधील 21 अर्ज पात्र ठरले होते. तर चार बाद झाले होते. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, आता राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे सहा उमेदवार आणि पाच अपक्ष उमेदवार मिळून 11 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे ऍड. किशोर शिंदे यांना राष्ट्रवादी काँगेस आघाडीने बिनशर्त पाठींबा दिला आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे, या लढतीकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्राह्मण महासंघाने आपला उमेदवार मागे घेत भाजपला पाठिंबा दिला आहे.

Related posts: