|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेस, राष्ट्रवादी नव्हे तर सुशीलकुमार स्वतः थकले : अजित पवार

काँग्रेस, राष्ट्रवादी नव्हे तर सुशीलकुमार स्वतः थकले : अजित पवार 

पुणे / प्रतिनिधी : 

सुशीलकुमार शिंदे स्वतः थकले आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष थकलेले नाहीत, थकणारही नाहीत असं आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज म्हटले आहे. पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा मेळावा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी खासदार वंदना चव्हाण, पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, हडपसर विधनसभा मतदार संघाचे उमेदवार चेतन तुपे, वडगाव शेरी विधनसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील टिंगरे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, सुशीलकुमार शिंदे हे स्वतः थकले आहेत त्यामुळे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस थकले आहे असे विधान केले आहे पण मी सांगू इच्छितो, काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय कधीही थकणार नाहीत असे पक्ष आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या नेत्याना प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाताना, चांगल्या प्रकारे संवाद साधवा. तसेच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार , देखील तेवढय़ाच निष्ठेन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.