|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पलुसकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. प्रभा अत्रे यांचे शास्त्रीय गायन

पलुसकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. प्रभा अत्रे यांचे शास्त्रीय गायन 

पुणे / प्रतिनिधी  : 
पंडित डि.व्ही. पलुसकर स्मारक ट्रस्टतर्फे पंडित डि.व्ही. पलुसकर यांच्या ६४ व्या पुण्यतिथीनिमित्त स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या शास्त्रीय गायन मैफलीचे आयोजन गुरूवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.०० वाजता, एस.एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती पंडित डि.व्ही. पलुसकर स्मारक ट्रस्टच्या कार्यवाह माधवी पोतदार यांनी कळवली आहे.
बापुराव अर्थात पंडित डि.व्ही. पलुसकर यांच्या असामान्य गायनाची आठवण जागृत ठेवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना राहुल गोळे (हार्मोनियम) आणि माधव मोडक (तबला)  हे वादक कलाकार साथसंगत करणार आहेत. 
पंडित डि.व्ही. पलुसकर स्मारक ट्रस्ट आणि पानसरे कुटुंबिय यांच्या संयुक्त विद्यमाने गेली पाच वर्षे १८ ते ३० वयोगटातील कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ‘स्वरोदय’ पुरस्कार देण्यात येतो. यंदा बदलापूर येथील अपूर्वा गोखले यांच्या शिष्या प्रियांका भिसे यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रुपये १० हजार आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मुंबई, लातूर, कर्नाटक अशा विविध ठिकाणांहून आलेल्या प्रवेशिकांमधून प्रियांका भिसे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

Related posts: