|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Top News » ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे आज, बुधवारी निधन झाले. वयाच्या 89 व्या वषी काकडे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचं मुंबईतील राहत्या निवासस्थानी निधन झालं. 50 वर्षांहून अधिक वर्ष ते रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. 94व्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषवले आहे.

अरुण काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास सन्मान या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. अरुण काकडे हे समांतर मराठी रंगभूमीवरील रंगायन, आविष्कार या नाटय़संस्थांचे संस्थापक सदस्य होते. त्यांचे ‘अमका’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.