|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » बंडाळीमुळे आघाडीलाच यश : अमित देशमुख

बंडाळीमुळे आघाडीलाच यश : अमित देशमुख 

लातूर / प्रतिनिधी : 

 राज्य सरकारविरोधात असंतोष असून, महायुतीमध्ये बंडाळीही झाली आहे. त्यामुळे लातूर जिह्यातील सहाही जागांवर काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि लातूर शहरचे उमेदवार आमदार अमित देशमुख यांनी येथे व्यक्त केला.

ते म्हणाले, गेल्या वेळीही देवेंद्र फडणवीस यांचा अर्ज वादात सापडला होता. निवडणूक आयोगाने त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला असला, तरीही न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. काँग्रेस सोडून गेलेल्यांना जनताच जागा दाखवून देईल. त्यांच्या जाण्याने पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही.

 

Related posts: