|Thursday, February 27, 2020
You are here: Home » क्रिडा » पुणे जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत खडकी आर्मी पब्लिक स्कूलचे यश

पुणे जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत खडकी आर्मी पब्लिक स्कूलचे यश 

पुणे / प्रतिनिधी  :

पुण्यातील बालेवाडी क्रिडा संकुल येथे झालेल्या पुणे जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धा 2019 मधे आर्मी पब्लिक स्कूल खडकीने दुसरा क्रमांक पटकावत यश मिळविले आहे.

या स्पर्धेमध्ये अंडर 19 या वयोगटामध्ये 4 x 400 मीटर स्पर्धेमध्ये आर्मी पब्लिक स्कूलचे प्रशिक्षक युनिस कोथली यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्वल दत्तात्रय वलेकर, रोहन पवार, तन्मय बर्वे, अभिजीत यादव या खेळाडूंनी सहभाग घेत सांघिक यश संपादन केले आहे.

या सर्वांची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धा 2019 साठी झाली असुन या स्पर्धेतही घवघवीत यश खेळाडु मिळवतील असा विश्वास प्रशिक्षक कोथली यांनी व्यक्त केला. 

Related posts: