|Saturday, January 25, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » भारतावरही ठळकपणे जागतिक मंदीचे सावट

भारतावरही ठळकपणे जागतिक मंदीचे सावट 

आयएमएफ प्रमुखांचे वक्तव्य : मोदी सरकारच्या अडचणीत वाढ

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

जगभरातील अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे. परंतु, भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेवर मंदीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएनएफ) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी म्हटले आहे. क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांच्या ऐन निवडणुकीतील वक्तव्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.

दोन वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्था प्रगतीकडे मार्गक्रमण करत होती. परंतु, आता जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठय़ावर आहे. जीडीपीचा विचार केल्यास 75 टक्के जगाचा प्रवास विकासाच्या दिशेने सुरू होता. 2019 मध्ये जगातील अर्थव्यवस्थेची वृद्धी 90 टक्क्मयांनी कमी होईल, असे आम्हाला वाटत आहे. अमेरिका आणि जर्मनीमधील बेरोजगारी ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. तरीही अमेरिका, जपान आणि विशेषतः युरो क्षेत्रातील आर्थिक घडामोडी मंदावल्या आहेत. परंतु, भारत आणि ब्राझीलसारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे, असे क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी सांगितले आहे.

आर्थिक विकासाचा अंदाज 7 टक्क्यांवर…

मंदीमुळे जागतिक व्यापाराची वृद्धी जवळपास थांबली आहे. भारताच्या देशांतर्गत मागणीत अपेक्षेपेक्षा कमी वाढीमुळे आयएमएफने आर्थिक वर्ष 2019-20 साठीच्या आर्थिक विकासाचा अंदाज 0.3 टक्क्मयांपर्यंत खाली आणत 7 टक्के केला आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

Related posts: