|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आदित्य ठाकरेंनी घेतला खासदार माने यांच्याकडून आढावा

आदित्य ठाकरेंनी घेतला खासदार माने यांच्याकडून आढावा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कागल विधानसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवार संजयबाबा घाटगे यांच्या प्रचारर्थ गडहिंग्लज येथील सभेस उपस्थित राहण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी कोल्हापूर दौऱयावर आले होते. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी ठाकरे यांचे पुष्पगुच्ध देवून स्वागत केले. यावेळी ठाकरे यांनी खासदार माने यांच्याकडून निवडणुकीचा आढावा घेतला.

दुपारी 1 वाजता ठाकरे यांचे विमानाने आगमन झाले. खासदार माने आणि ठाकरे यांच्यात सुमारे अर्धा तास विमानतळावर बंद खोलीत चर्चा झाली. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात झालेल्या बंडखोरीबाबत खासदार माने यांच्याकडून माहिती घेतली. जिल्हय़ात आठ मतदार संघात शिवसेना उमेदवार आहे. दोन मतदार संघ भाजपच्या वाटय़ाला गेले आहेत. दहाही विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना ठाकरे यांनी केल्याचे समजते. गडहिंग्लज येथील सभेसाठी जाण्यासाठी खास मुंबईहुन  आणण्यात आलेल्या हेलीकॉप्टरने ठाकेर सभेसाठी रवाना झाले. तेथील सभा उरकून दुपारी हातकणंले मतदार संघातील उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रचारार्थ शिरोली येथे ठाकरे यांनी सभा घेतली.