|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » घाटणेकरांची उमेदवारी रद्द; संजय शिंदे करमाळ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार

घाटणेकरांची उमेदवारी रद्द; संजय शिंदे करमाळ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार 

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचा खुलासा-

शिवाजीराव काळुंगे काँग्रेसमधून बडतर्फ, सांगोल्यात शेकापलाच पाठिंबा

प्रतिनिधी/ सोलापूर

करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये एबी फॉर्म देऊन संजय पाटील-घाटणेकर यांना अगोदरच जाहीर झालेली उमेदवारी पक्षाच्या पातळीवर रद्द करण्यात आली आहे. त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे असलेले संजयमामा शिंदे यांना त्यांच्या सफरचंद या चिन्हासह राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केलेला असून, संजयमामा शिंदे हेच करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार असतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

उमेश पाटील म्हणाले, सोलापूर जिह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोहोळ, पंढरपूर, माळशिरस आणि बार्शी या विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर अधिकृतपणे उमेदवार उभे आहेत. करमाळा आणि सांगोला या ठिकाणच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या संदर्भामध्ये पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चा करून करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये एबी फॉर्म देऊन संजय पाटील यांना अगोदरच जाहीर झालेली  उमेदवारी पक्षाच्या पातळीवर रद्द करण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे असलेले संजयमामा शिंदे यांना त्यांच्या सफरचंद या चिन्हासह  राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे संजयमामा शिंदे हेच करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असतील. सांगोलामध्ये शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सर्वांच्या वतीने हा  मतदारसंघ मित्र पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात आलेला होता. मध्यंतरी पक्षाच्या पातळीवर मैत्रीपूर्ण लढती झाल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी अर्ज दाखल केला होता आणि त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध झाला होता. तो अर्ज रद्द करण्यात यावा, या संदर्भातील परिपत्रकही काढण्यात आले होते. परिपत्रक निवडणूक अधिकारी भोसले यांच्याकडेदेखील सादर करण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगोलामध्ये शेतकरी कामगार पक्षासोबत असेल. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातसुद्धा आमदार भारत भालके हेच राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. शिवाजी काळुंगे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाहीत, असा खुलासा काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने केला आहे. शिवाय त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे, असेही पाटील म्हणाले.  

अमोल कोल्हे आणि चाकणकर यांच्या आज सभा

 गुरुवारी 10 तारखेला सोलापूर जिह्यामध्ये खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचा एकत्रित प्रचार दौरा आहे. त्याची सुरुवात मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज या ठिकाणी सकाळी दहा वाजता होणार आहे. त्यानंतर बार्शी विधानसभा मतदारसंघांमध्ये वैराग येथे दुपारी 12 वाजता आणि त्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये करकंब याठिकाणी दीड वाजता, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघामध्ये मंगळवेढा या ठिकाणी तीन वाजता होणार आहे. 

  पथसंचलनावर फुले उधळणाऱयांचे समर्थन करणार नाही

आरएसएस ही जगातली पहिली दहशतवादी संघटना असे आम्ही म्हणतो. नथुराम गोडसे हा जगातला पहिला दहशतवादी असं समजतो आणि ज्या नथुराम गोडसेला क्रांतिकारी युगपुरुष मानणारी ही कधीही समर्थनीय असू शकत नाहीत. जे उमेदवार आरएसएसची टोपी घालून किंवा त्यांच्यावर फुले उधळतात, त्याचं समर्थन करणार नाही. याची दखल पक्षपातळीवर शरद पवार यांनी घेतली आहे. त्यांची विचारधारा आणि राष्ट्रवादी पक्ष असेल. काँग्रेस पक्षातील सर्व आमचे पुरोगामी विचाराचे असतील. त्यांच्या विचारांमध्ये संघटना या सगळ्यात जातीयवादी समाजामध्ये फूट पाडणाऱया संघटना आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थन केलं जाऊ शकत नाही. सरदार वल्लभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती. त्यामुळे याबाबत कुठल्याही प्रकारचा समजूत असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

एकत्र येण्याच्या चर्चा पहिल्यांदा होत नाहीत

 काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार, अशा पद्धतीच्या चर्चा पहिल्यांदा होत नाही. अशा चर्चा वावडय़ा होतातच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय सक्षमपणे राज्यांमध्ये आणि देशातल्या काही राज्यांमध्ये अतिशय सक्षमपणे उभा आहे, असेही उमेश पाटील म्हणाले.

Related posts: