|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बार्शे गावात सव्वातीन किलो मीटर लांबीचा बोगदा

बार्शे गावात सव्वातीन किलो मीटर लांबीचा बोगदा 

गोव्यातील सर्वात लांबीचा बोगदा

प्रतिनिधी/ मडगाव

कोंकण रेल्वे केंकणातून धावणार याचा सुरवातीला कुणीच विचार केला नव्हता. कोंकणातील हिरवेगार डोंगर, नाले, नद्या यातून रेल्वे मार्ग कसा निघणार असा प्रश्न सर्वांना भेडसावत होता. पण, कोंकण रेल्वेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत कोंकणातून रेल्वे मार्ग तर साकारलाच, त्याच बरोबर अशक्यप्राय वाटणारी गोष्ट साध्य करताना एका स्वप्नाची पूर्तता देखील केली.

कोंकण रेल्वेच्या अभियंत्यांनी अत्यंत कठीण वाटणारी कामे सहज सुलक्ष बनविली. नद्यावर मोठे पूल उभारले तर डोंगर पोखरून बोगदे तयार केले. त्यामुळे कोंकणातून रेल्वेचा मार्ग निर्माण झाला. गोव्यात बार्शे गावातील बोगदा हा सर्वात मोठा बोगदा आहे. या बोगद्याची लांबी 3,343 मीटर ऐवढी आहे. या बोगदय़ाचे काम 1991 मध्ये हाती घेण्यात आले व ते 1995 मध्ये पूर्ण करण्यात आले. हा बोगदा तयार करण्यासाठी तब्बल चार वर्षे लागली.

बार्शेतील बोगदय़ात रेल्वे रूळ घालताना काँक्रिटचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे हे रेल्वे रूळ खचण्याची शक्यता कमी असते. हा बोगदा सव्वातीन किलोमीटर लांबीचा असल्याने, बोग्नगदय़ाची निर्मिती करताना पूर्ण सुरक्षा कवच तयार करण्यात आलेला आहे. बोगदय़ात ‘ब्लोअर फॅन’ बसविण्यात आलेले आहे. या ब्लोअर फॅनच्या सहाय्याने बोगदय़ातील रेलगाडीचा धूर बाहेर फेकला जातो, त्यामुळे बोगदय़ात धूर कोंडून रहात नाही व प्रवाशांना देखील कोणता त्रास जाणवत नाही. जेव्हा रेलगाडी या बोगदय़ात आत शिरते, तेव्हा हे ब्लोअर फॅन सुरू होतात. हे देखील या बोगदय़ाचे एक वैशिष्टय़ आहे.

देशातील 24 प्रमुख बोगदय़ामध्ये बार्शे बोगदय़ाचा क्रमांक आठवा लागतो. या बोगदय़ाद्वारे बाळळी व काणकोण स्थानके एकमेकांना जोडण्यात महत्वाचा दुवा मानला जातो. या बोगदय़ाची निर्मिती करून कोंकण रेल्वेने येथील पर्यावरणाचे हितजपले आहे. डोंगर खोदून रेल्वे मार्ग तयार केला असता तर अनेक वृक्षांची हानी झाली असती. बोगदय़ाची निर्मिती ही पर्यावरणाची सांगड घालणारी ठरली आहे.