|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो ऍण्ड समिट 2019’चे आयोजन

‘व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो ऍण्ड समिट 2019’चे आयोजन 

प्रतिनिधी/ पणजी

पणजी येथील ताळगांव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे दि. 17 ते 19 ऑक्टोंबर दरम्यान ‘व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो ऍण्ड समिट 2019’ चे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये सुमारे 500 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. अशी माहीती व्हायब्रंट गोवाचे अध्यक्ष राजकुमार कामत यांनी दिली.

पणजी येथील हॉटेल ताज विवांता येथे आयोजित पत्रकार परीषदेत राजकुमार कामत यांनी ही माहीती दिली. यावेळी त्यांच्यासोबत या समिटचे पुरस्कृत भागिदार मनोज काकुलो, मंगेश प्रभुगांवकर, सिध्दांत नाईक, मांगिरीश सालेलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

सदर समिट हे गोव्यातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे औद्योगिक समिट असणार आहे. या समिटमध्ये सुमारे 275 बुथचे बुकिंग आधीच झाले आहे. तसेच या परिषदेदरम्यान नॉलेज सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींची 25 व्यख्याने असणार आहे. त्याचप्रमाणे या परिषदेला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित प्रतिनिधींची खास उपस्थिती असणार आहे. यामध्ये युएईच्या अर्थव्यवस्थेचे परराष्ट्र व्यापार सचिव महामहिम जुए अल कैट, मार्सिलो येथील बिझनेस क्लब फ्रान्स-इंडियाचे सचिव व्यवस्थापक वेरोनिका मोंकाडो, युएसए येथील बॅबको फूड्स इंटरनेशनलचे उपाध्यक्ष केन वाझ, व नेपाळ चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष राजेश काझी यांचा समावेश आहे. असे कामत यांनी पुढे सांगितले.

गोव्यातील व्यवसाय वृध्दीसाठी व्हायब्रंट गोवा समिटच्या माध्यमातून अनेक संधी उद्योजकांना मिळणार आहे याचा उपयोग गोव्यातील उद्योजकांनी करावा. या समिट विषयी अधिक माहीतीसाठी www.vibrantgoa.com या संकेतस्थळावर भेट द्यावी व नोंदणी करावी. असे आवाहन यावेळी आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.