|Friday, October 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » कियारा अडवाणीचं ट्विटर अकाउंट हॅक

कियारा अडवाणीचं ट्विटर अकाउंट हॅक 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

‘कबीर सिंग’ चित्रपटाला प्रचंड यश मिळाल्यानंतर अभिनेत्री कियारा अडवाणीच्या करियरला चांगलीच कालाटणी मिळाली आहे. कियारा सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. सध्या तिचा ट्विटर अकाउंट हॅक झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या गोष्टीची माहिती तिने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून दिली आहे.

इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये ‘माझं ट्विटर आकाउंट हॅक करण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या पोस्टकडे दुर्लक्ष करा.’ असे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे. कियारा लवकरच ‘लक्ष्मी बॉम्ब, गुडन्युज, शेरशाह’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.