|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » गळा आवळून युवतीचा खून

गळा आवळून युवतीचा खून 

प्रतिनिधी/सांगली :

प्रेमप्रकरणातून शहरातील बसस्थानक समोरील असलेल्या लॉजमध्ये युवतीचा रूमालाने गळा आवळून खून केल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी उघडकीस आला. वृषाली अर्जुन सूर्यवंशी (वय 20, रा. पंचशीलनगर) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. तर अविनाश लक्ष्मण हातेकर (वय 24) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संशयिताकडून युवतीवर बलात्कार करून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या खुनाची नोंद शहर पोलिसात झाली आहे. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत वृषाली ही बुधवारी दुपारी मैत्रीणीकडे जाते असे सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर ती परत आली नाही. दिवसभर पालकांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने मोबाईल घेतला नाही. रात्री साडेआठच्या सुमारास ती मित्र संशयित आरोपी अविनाश याच्याबरोबर बसस्थानक समोरील टुरिस्ट लॉजमध्ये आले. दोघांनी ओळखपत्र देऊन खोली नं 107 बुक केली. रात्रीच्या वेळेसच तिचा रूमालाने गळा आवळून खून केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अमित परीट यांना बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये युवतीचा खून झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखालील पथक लॉजमध्ये दाखल झाले.

 यानंतर त्यांनी लॉज व्यवस्थापनाकडे दिलेल्या ओळखपत्रावरून संबंधित युवतीच्या पालकांना याची माहिती दिली. पालक आल्यानंतर त्यांनी मुलीचा मृतदेह बघून एकच हंबरडा फोडला. पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून रात्री उशिरा पालकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. दरम्यान, पोलिसांच्या अधिक तपासामध्ये संशयित आरोपी अविनाश हा गुन्हेगार असून त्याच्या नावावर विश्रामबाग पोलिसात एक गुन्हा दाखल आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास लॉज बुक केल्यानंतर युवतीला दुसऱया मजल्यावरील खोलीमध्ये नेताना तो त्याला मारहाण करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. युतीच्या गळय़ाभावेती काळे वण उठले असल्याचे दिसून येत असल्याने त्याने रात्रीच्या वेळीच रूमालाने गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट होत आहे. प्रेमप्रकरणातूनच खून केल्याचे स्पष्ट होत आहे. याची रात्री उशिरा शहर पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related posts: