|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » बंडखोर नगरसेवक ओव्हाळ यांची भाजपातून हकालपट्टी

बंडखोर नगरसेवक ओव्हाळ यांची भाजपातून हकालपट्टी 

ऑनलाईन टीम / पिंपरी :

पिंपरी मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात बंडखोरी करणारे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याची माहिती भाजपच्या प्रदेश कार्यालयातून देण्यात आली.

महायुतीत पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला मिळाला आहे. शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी बंडखोरी केली आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करुन ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे भाजपने आज ओव्हाळ यांची पक्षातून हकालपट्टी केली.

पिंपरी महापालिका निवडणुकीत रावेत-किवळे प्रभागातून बाळासाहेब ओव्हाळ भाजपच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, त्यांनी काही दिवसांपूर्वी गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचा कार्यक्रम देखील घेतला होता. त्यात मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली होती.

Related posts: