|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » शिवसेनेच्या ‘वचननाम्या’चे उद्या मातोश्रीवर प्रकाशन

शिवसेनेच्या ‘वचननाम्या’चे उद्या मातोश्रीवर प्रकाशन 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

शिवसेनेचा विधानसभा निवडणूकपूर्व ‘वचननामा’ उद्या, शनिवारी सकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित करण्यात येणार आहे. या वचननाम्यात मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस पडणार असल्याचं समजतंय. त्यापैकी प्रत्यक्षात किती आश्वासनांची पूर्तता होतेय, हे शिवसेना सत्तेत आल्यावरच स्पष्ट होईल.

दरम्यान प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून दिले जात असलेले दहा रुपयांत जेवणाचे ‘वचन’ यात दिले जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या ‘वचननाम्या’ मध्ये फक्त दहा रुपयांत जेवणाची थाळी, वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना, महिला सक्षमीकरणावर भर, विद्यार्थ्यांना वाहतुकीमध्ये विशेष सवलत, कृषी उत्पन्न आणि शेतकऱयांच्या विविध समस्यांवर विविध योजना, उद्योग व्यापारावाढीसाठी विशेष योजना, शहरांच्या विकासासाठी विशेष योजना, रोजगार उत्पन्नासाठी विशेष योजना आदी मुद्दे जाहीरनाम्यात येण्याची शक्यता आहे.