|Friday, December 13, 2019
You are here: Home » उद्योग » स्मार्ट वीज मीटरसाठी इइएसएल-एनआयआयएफ एकत्र

स्मार्ट वीज मीटरसाठी इइएसएल-एनआयआयएफ एकत्र 

देशभरात सर्वत्र स्मार्ट वीज मीटर बसवण्याची योजना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील वीज वितरण करणाऱया कंपन्यांची सर्व घरात स्मार्ट वीज मीटर लावण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्याला मूर्तस्वरुप देण्यासाठी एनर्जी एफिसियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) आणि नॅशनल इन्वेस्टमेन्ट ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एनआयआयएफ) यांनी हात मिळवली केलेली आहे.दोन्ही कंपन्यांनी इंटेलीस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या नावानी संयुक्तपणे उपक्रम तयार केला आहे. की जो स्मार्ट मीटर कार्यक्रमाची चालवणार आहे. 

या संयुक्त उपक्रमातून सरकार येणाऱया काळात देशात जवळपास 25 कोटी स्मार्ट वीज मीटर जोडणीची योजना तयार केली जात आहे. स्मार्ट ग्रिड, ऊर्जा समस्या यांचा सामना करण्यासाठी स्मार्ट वीज मीटर महत्वाचे असल्याचे ईईएसएल आणि एनआयआय यांनी म्हटले आहे.

24 तास वीज उपलब्ध

प्रत्येक नागरिकांना 24 तास वीज उपलब्ध देण्याचे ध्येय सरकारकडून निश्चित केले आहे. 25 कोटी स्मार्ट वीज मीटर लावण्यात आल्यावर ग्राहकांना देण्यात येणाऱया बिलात 80 ते100 टक्क्यापर्यंत सुधारणा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशाचा महसूल 1104 अब्ज रुपयापर्यंत वाढण्याचा अंदाज वीज वितरण कंपन्यांनी व्यक्त केला आहे.

Related posts: