|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री पुन्हा बचावले

हेलिकॉप्टर अपघातातून मुख्यमंत्री पुन्हा बचावले 

पुणे/ प्रतिनिधी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टर अपघातातून पुन्हा एकदा बचावले. पेण येथे प्रचारसभेसाठी जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. सुदैवाने पुढील अनर्थ टळला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे रायगड जिल्हय़ातील पेण येथे भाजपचे उमेदवार रवींद्र पाटील यांच्या प्रचाराकरिता जात होते. या पार्श्वभूमीवर त्यांचे हेलिकॉप्टर पेण बोरगाव येथे लँड करण्यात आले. मात्र, हेलिपॅडवरील मातीत त्यांच्या हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले. मात्र, प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण प्राप्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री त्यांचे पीए, एक इंजिनिअर, एक पायलट आणि को-पायलट असे पाचजण बसले होते.

हेलिपॅडवर चिखल झाल्याने अपघात

हेलिगो चार्टर प्रा.लि.चे हे हेलिकॉप्टर होते. पाऊस पडल्याने माती भिजली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले असावे. 4 वाजून 25 मिनिटांनी पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लँड झाले. तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचे सांगण्यात येत आहे.

 दुजोरा मात्र नाही

 दरम्यान, जिल्हा अधीक्षक अनिल पारसकर म्हणाले, असा कोणताही अपघात झालेला नाही. हेलिकॉप्टर लँड होताना असे प्रकार होतात. मुख्यमंत्री सुरक्षितरीत्या खाली उतरले आणि पुन्हा रवाना झाले.

Related posts: