|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » हरियाणासाठी काँगेसच्या वचनपत्राची घोषणा

हरियाणासाठी काँगेसच्या वचनपत्राची घोषणा 

चंदीगड

 : काँगेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपले वचनपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात महिलांना सरकारी नोकऱयांमध्ये 33 टक्के आरक्षण, शेतकऱयांना कर्जमाफी इत्यादी आश्वासने देण्यात आली आहेत. पंचायत राज संस्थांमध्येही महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचे सांगण्यात आले. हरियाणा प्रदेश काँगेसच्या अध्यक्षा कुमारी सेलजा यांनी हे वचनपत्र प्रसिद्ध केले. अनुसूचित जाती आणि अती मागासवर्गियांमधील विद्यार्थ्यांना पहिली ते दहावी शिक्षणासाठी प्रत्येकी वर्षाला 12 हजार रूपयांची, तर अकरावी आणि बारावीच्या याच समाजघटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षाला 15 हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासनही वचनपत्रात देण्यात आले आहे.

Related posts: