|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » रोहिणी हट्टंगडी यांना ‘विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार’ जाहीर

रोहिणी हट्टंगडी यांना ‘विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार’ जाहीर 

ऑनलाईन टीम / सांगली :

मराठी रंगभूमीवरील मानाचा ‘विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार’ ज्ये÷ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे. नाटय़ क्षेत्रातील सर्वोच्च मनाचे मानले जाणारे आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक यंदाच्या वषी ज्ये÷ रंगकर्मी यांना जाहीर झाले आहे. शनिवारी अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्या मंदिर समितीने या पुरस्काराची घोषणा येथे पत्रकार परिषदेत केली.

प्रत्येक वषी रंगभूमी दिनी म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी या गौरव पदकाचे वितरण नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षांच्या हस्ते केले जाते. रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक नाटकांतून आणि चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांच्या चित्रपटांत सहा तेलुगू चित्रपट आहेत. त्याशिवाय हिंदी-मराठी दूरदर्शन मालिकांतूनही त्या दिसतात. हट्टंगडी दाम्पत्याने ‘कलाश्रय’ ही नाटय़ाभ्यास करणारी व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी संस्था स्थापन केलेली आहे. त्या संस्थेतर्फे त्यांनी ‘वाडा भवानी आईचा’, ‘अपराजिता’ (एकपात्री प्रयोग) अशा नाटकांमध्ये वैशिष्टय़पूर्ण भूमिका केल्या आहेत.

रोहिणी हट्टंगडी यांनी अक्कल धावते घोडय़ापुढे, अंधेका हाथी (हिंदी), अमे जीविये बेफाम (गुजराती), असा मी काय गुन्हा केला (बालनाटय़), आपण क्लबात भेटलो होतो, उद्ध्वस्त धर्मशाला (हिंदी), ऋतुगंध, एकच प्याला, कथा कुणाची व्यथा कुणा, कधीतरी कुठेतरी, कस्तुरीमृग (पहिले व्यावसायिक नाटक), कळी एकदा फुलली होती, खंडोबाचं लगीन, गावगुंड, गिद्ध (हिंदी), ग्रेट गॉड ब्राऊन (हिंदी), चांगुणा, जंगलातला वेताळ (बालनाटय़), जुगलबंदी (गुजराती) यासारख्या अनेक नाटकांमधून आपल्या अभिनयाची छटा उमटवली आहे.