|Friday, October 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. 13 ते 19 ऑक्टोबर 2019

मेष

तुला राशीत सूर्यप्रवेश,  चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रागावर ताबा ठेवा. अरेरावी न करता कामे करा. धंद्यात वाढ होईल. मागील येणे वसूल करा. नोकरीतील व्याप सहन करावा लागेल. वरि÷ांना खूष करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी, तणाव, वाद हळूहळू कमी करता येईल. कला, क्रीडा, साहित्यात तुम्हाला नवीन संधी शोधता येईल. ओळखीचा फायदा होईल. कोर्टकेसमध्ये योग्य सल्ल्याने बोला.


वृषभ

तुला राशीत सूर्यप्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यात वाढ होईल. गिऱहाईकाबरोबर भांडण वाढवू नका. कामगारांना खडसून बोलू नका. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांच्या मतानुसार निर्णय घ्या. दौऱयात अडचण येऊ शकते. अधिकारी थाटात वागू नका. कायद्याचे पालन, घरातील खर्च वाढेल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. कला, क्रीडा, साहित्यात गैरसमज होऊ शकतो.


मिथुन

तुला राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात घाई करू नका. धंद्यात मोठे काम मिळेल. थकबाकी वसूल करा. कोजागरी पौर्णिमेला  शुभसमाचार मिळेल. नोकरीत वरि÷ जबाबदारी देतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना गती मिळेल. कामाचे कौतुक होईल. कला, क्रीडा, साहित्यक्षेत्रात स्पर्धा जिंकाल. कोर्टाच्या संबंधी कामे होतील. राग वाढू देऊ नका.


कर्क

तुला राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. महत्त्वाची कामे करून घेण्याचा प्रयत्न करा. धंद्यात वाढ करता येईल. सप्ताहाच्या शेवटी मनाविरुद्ध काम करावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात मोठय़ा लोकांच्या ओळखी होतील. सामाजिक कार्याला आर्थिक मदत मिळवता येईल. घरातील कामे होतील. घर, वाहन, जमीन घेण्याचा विचार कराल, कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात नावलौकिक मिळेल. कोर्टकेस संबंधी समस्या लवकर संपवा.


सिंह

तुला राशीत सूर्यप्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी धावपळ जास्त होईल. डोळय़ांची काळजी घ्या. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. जमिनीसंबंधी कामे करून घेता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. वाटाघाटीत यश मिळेल. संसारातील तणाव कमी होईल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. मोठय़ा लोकांची ओळख होईल. कोर्टकेस जिंकाल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल.


कन्या

तुला राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात घाई करू नका. रागावर ताबा ठेवा. धंद्यात फायदा वाढेल. मोठे काम मिळेल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. तुमचा प्रभाव राहील. कोणताही कठीण प्रश्न लवकर सोडवा. नोकरीत बदल करू शकाल. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. पैसा मिळेल. शिक्षणात प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी.


तुळ

तुमच्याच राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. रेंगाळत राहिलेली कामे करून घेता येतील. थोडा विलंब मात्र सहन करावा लागेल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात काळजी घ्या. वाहन जपून चालवा. किरकोळ दुखापत संभवते. धंद्यात मोठे काम मिळेल. तुमचे विचार प्रेमाने पटवून द्या. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. छुपे शत्रू काडय़ा घालण्याचा व्यर्थ प्रयत्न करतील. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात नावलौकिक मिळेल. तुमचे कौतुक होईल. शिक्षणात पुढे जाल.


वृश्चिक

तुला राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात धावपळ जास्त होईल. समोरची व्यक्ती दिलेला शब्द पाळणार नाही. त्यामुळे कटकट होईल. मैत्रीचा उपयोग होणार नाही. मागील येणे मिळणे कठीण आहे. नोकर माणसांना सांभाळून ठेवावे लागेल. राजकीय- सामाजिक कार्यात लोकांच्या भावना समजून घ्या. अरेरावी केल्याने वाद होईल. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात स्पर्धा वाढेल. संसारात नाराजी होईल. इतरांची कामे करावी लागतील.


धनु

तुला राशीत रविप्रवेश, रवि, चंद्र त्रिकोण योग होत आहे. महत्त्वाच्या  कामाला गती देता येईल. नोकरीतील तणाव कमी होईल. धंद्यात नवे तंत्र शोधता येईल. स्वत: मेहनत घ्या, धंदा वाढेल. मागील येणे वसूल करा. संसारातील कामे होतील. नवीन ओळखी कला क्षेत्रात होतील. प्रेमाला चालना मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. जबाबदारी घ्यावी लागेल. कला, क्रीडा, साहित्यात तुमचे कौतुक होईल. नवे मित्र मिळतील.


मकर

तुला राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात मोठी वाढ करता येईल. नवा फंडा उपयोगी पडेल. महत्त्वाचा निर्णय धंद्यात लवकर घ्या. समस्या सोडवा. नोकरीत फायदेशीर बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव टिकून ठेवता येईल. लोकांच्यापर्यंत पोहचता येईल. त्यांना मदत करता येईल. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात चमकाल. नवीन ओळख होईल. कोर्टकेस लवकर संपवा.


कुंभ

तुला राशीत रवि प्रवेश, रवि, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात फायदा वाढेल. मोठी ऑर्डर मिळवता येईल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने प्रगती करता येईल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. बदल करता येईल. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात तुमच्या गुणांचा विकास करण्याची संधी मिळेल. कोर्टकेस जिंकाल.


मीन

तुला राशीत रविप्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात तडजोडीचे धोरण ठेवा. म्हणजे नुकसान, वाद होणार नाही. नोकरांना दुखवू नका. मैत्रीत, भागीदारीत  तात्पुरता तणाव होईल. राजकीय, सामाजिक कार्यात गैरसमज होऊ शकते. प्रति÷sचा अहंकार ठेवू नका. घरात क्षुल्लक समस्या येईल. वृद्ध क्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात स्पर्धा वाढेल. कोर्टकेसमध्ये विचारपूर्वक मुद्दे मांडा.