|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विधानसभा निवडणुकीत भविष्यातील नेतृत्व ठरविण्याची क्षमता : नितीन गडकरी

विधानसभा निवडणुकीत भविष्यातील नेतृत्व ठरविण्याची क्षमता : नितीन गडकरी 

प्रतिनिधी/ लातूर

लातूर जिह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम मोठय़ा प्रमाणावर चालू आहे. जिह्यातील पिण्याचे पाणी, राष्ट्रीय रस्त्याच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यात येत असले तरी महाराष्ट्र-कर्नाटक सिमावर भागातून लातूर हायवेला जोडण्याचे काम येणाऱया काळात होईल. रस्त्याच्या माध्यमातून या भागाचा विकास केला जाईल. तसेच मांजरा नदीवरील हंचनाळ येथे ब्रीज काम बंधाऱयाचे काम करून शेतकऱयांच्या जीवनात आर्थिक क्रांती कशी होईल यासाठी आम्ही सर्वांचा प्रयत्न आहे. येणाऱया विधानसभेच्या निवडणुकीत भविष्यातील नेतृत्व ठरविण्याची क्षमता असल्याने निलंगा मतदारसंघातील नागरीकांनी संभाजी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. या भागातील विकासाची हमी मी देतो असे हमीवचन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी देवणी येथील जाहीर सभेत दिली.

लातूर जिह्यातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित देवणी येथील जाहीर सभेत नितीन गडकरी बोलत होते. या सभेला खा. सुधाकर श्रृंगारे, माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर, माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ. कव्हेकर, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, आदिंची उपस्थिती होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम केल्याचे सांगून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ज्या पध्दतीने देशाचा विकास होत आहे. त्याच पध्दतीने लातूर जिह्याचा विकास करण्याची क्षमता संभाजीरावांकडे आहे.

संभाजीराव यांनी केवळ मतदारसंघाच्या विकासाचा विचार न करता संपूर्ण जिह्याच्या विकासाचा ध्यास घेवून मागील काळात काम केलेले आहे. संभाजीराव ज्या-ज्यावेळी दिल्लीत आले त्या-त्यावेळी त्यांनी केवळ जिह्याच्या विकासाच्याच मागण्या केलेल्या आहेत. आगामी काळातही त्यांच्या नेतृत्वात जिह्याचा विकास योग्य दिशेने जाईल असा विश्वास व्यक्त करून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शेतकर्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. देशातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतीसाठी नवीन धोरण राबवण्याचा संकल्प सरकारने केला आहे. नवीन पीक पध्दत अवलंबात आणत शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

देशाची वाढती इंधन गरज भागवण्यासाठी तथा 8 लाख कोटीचे परकीय चलन वाचविण्यासाठी इथेलाँनची निर्मिती करण्यानासाठी देशातील 300 ते 350 बंद साखर कारखाने इथेनॉल तयार करण्याच्या अटीवर कारखान्याचे पुनर्जीवन करण्यात येईल. ऊसा सोबतच सोयाबीनच्या काडापासुन इथेनॉल तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले असुन त्याचे प्रायोगिक तत्वावर विदर्भातील पाच जिह्यात सुरुवात केल्याचे सांगितले. याच धर्तीवर लातूर जिह्यातील इथेनॉल प्रकल्प उभा करण्यासाठी आवश्यक असणारी सर्वोतपरी मदत आपण करू अशी ग्वाही देत या माध्यमातून जिह्यातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार प्राप्त होईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी दिला.

देशाच्या विकासासाठी रस्ते बांधण्याला प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रात 5 लाख कोटीचे रस्त्याची कामे प्रगतीपथावर असुन विकासापासुन वंचित असलेल्या सीमा भागातील देवणी तालुक्याला राष्ट्रीय महामार्गाला जोडणार आहे. लवकरच तोगरी देवणी शिरुर अनंतपाळ मार्गे लातुर हा राष्ट्रीय महामार्ग करण्याचे स्पष्ट आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले. देवणी व निलंगा मतदारसंघाच्या विकासासाठी मतदारांनी भाजपा व संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुन होवू घातलेल्या निवडणुकीत त्यांना लाखोंच्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी बोलतांना कार्यकर्त्यांच्या बळावर जिह्यात पक्षसंघटनेत वाढ करत जिह्यातील सर्वच सत्ता केंद्रांवर भाजपाचा झेंडा फडकाविण्याचे काम केल्याचे सांगत ज्यांनी आम्हाला विरोध केला त्यांनाही सोबत घेवून काम केल्याचे स्पष्ट केले. आगामी काळातही केवळ विकासाचेच राजकारण करू असे सांगत मतदारसंघासह जिह्याच्या विकासाला कटिबध्द राहु अशी ग्वाही यावेळी दिली. याभागातील बेरोजगारांचे मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होत आहे. ते रोखण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मतदार संघात शेतीशी निगडीत लघुउद्योग उभारुन तरुणांच्या हाताला काम देणार असल्याचे अभिवचन यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांनी दिले.