|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अक्कलकोटमध्ये डेंग्यूसदृश तापाने चिमुकलीचा मृत्यू

अक्कलकोटमध्ये डेंग्यूसदृश तापाने चिमुकलीचा मृत्यू 

अक्कलकोट / प्रतिनिधी

शहरातील स्टेशन रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱया श्रावणी अनिल माशाळे (वय 8) या चिमुकलीचा डेंग्यूसदृश्य तापाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ती दुसरीत शिकत होती. मयत श्रावणी माशाळे ही बालसंस्कार केंद्राची विद्यार्थिनी होती. तिला रात्री अचानक ताप वाढल्याने नातेवाईकांनी सोलापूरला उपचारासाठी हलविले होते. शुक्रवारा रात्री निधन झाले.

अक्कलकोट शहरातील शिवाजी नगर तांडा, इंदिरा नगर, पाण्याची टाकी परिसर, समता नगर भागात तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. या वृत्तास ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी दुजोरा दिला आहे. शिवाजी नगर तांडा व परिसरात डेंग्यू सदृश्य आजाराचे चार-पाच रुग्ण आढळले असून, तापाचे रुग्ण मोठया प्रमाणात आहेत. शहरातील या भागात नगरपरिषद आरोग्य विभाग तसेच जिल्हा डेग्यू नियंत्रण विभागाने तातडीने लक्ष देऊन या भागात जनजागृती करावी. तसेच डेंग्यूचे डासांच्या नायनाटासाठी औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.