|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आगीत रुग्णवाहिका जळून खाक

आगीत रुग्णवाहिका जळून खाक 

वार्ताहर/   उगार खुर्द

येथील रुग्णसेवा मंडळाच्या रुग्णवाहिकेला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या आगीत सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले असून रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे.

 रुग्णसेवा मंडळातर्फे रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. रुग्णवाहिका शेडमध्ये थांबविण्यात आली होती. शनिवारी दुपारी अचानक रुग्णवाहिकेने पेट घेतला. आगीने आपले रौद्ररुप धारण केल्याने रुग्णवाहिकेतील उपचारासाठीचे सर्व साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. शेडमधील रुग्णवाहिकेजवळ असणारी मोटारसायकल व शववाहिका बाहेर काढल्या. उगार साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करून आग विझविण्यात आली. सदर घटनेची नोंद कागवाड पोलिसात झाली आहे.

Related posts: