|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चोपडेच्या दर्यासम्राट वेताळ देवस्थानात तरंगोत्सावाची अवसारी कौलाने झाली सांगता

चोपडेच्या दर्यासम्राट वेताळ देवस्थानात तरंगोत्सावाची अवसारी कौलाने झाली सांगता 

प्रतिनिधी/ मोरजी

चोपडे येथील श्री  दर्यासम्राट वेताळ  देवस्थानात तरंगोत्सवास  सोमवार 7 ऑक्टोबर डनवम़ी प्रारंभ झाला होता  श्री देव रवळनाथाच्या प्रांगणात रविवार  दि 13 ऑक्टोबर  रोजी सकाळी  कौलोत्सावाने उत्सवाची सांगता झाली.

7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चोपडे येथील श्री रवळनाथ मंदिरात श्री देव रवळनाथ ,श्री देव भूतनाथ आणि देवी भूमिका मिळून तीन तरंगे सजवण्यात आली होती .मंगळवार 8 रोजी श्री रवळनाथ मंदिरातून  सकाळी ही तरंगे वाजत गाजत शिवलग्नासाठी  कलमाजवळील पारंपारिक जागेत आली  त्याठिकाणी शिवलग्नविधी झाल्यानंतर  श्री भूमिका मंदिरात वास्तव्यासाठी राहिली   त्यानंतर बुधवार 9 ऑक्टोबर रोजी सकाळी त्या ठिकाणी भाविकांनी  दर्शन घेतले , या ठिकाणी सुवासिनीकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला . संध्याकाळी 3.30 वा.उपस्थित भाविकांना अवसारी कौल दिला  त्यानंतर ही तरंगे चोपडे येथील श्री दर्यासम्राट वेताळ मंदिरात वास्तव्यासाठी आली . त्याठिकाणी बुधवार  9 व  गुरुवार 10 ऑक्टोबर असे दोन दिवस वास्तव्य केल्यानंतर शुक्रवार 11 रोजी दुपारी 3.30 वा श्री वेताळ मंदिरातून श्री कालिका मंदिराजवळ आली , त्याठिकाणी भाविकांना कौल दिला . त्यानंतर खुर्बान वाडा येथील सटी देवस्थानाजवळ गेली  त्या ठिकाणी आवश्यक विधी झाल्यानंतर सेवेकऱयाना पारंपारिक कौल दिला  कौलानंतर  तरंगे वास्तव्यासाठी श्री देव कुळ्कार मंदिरात वास्तव्यासाठी गेली  शुक्रवार 11 रोजी रात्री वास्तव्य केल्यानंतर शनिवार 12 रोजी सकाळी विविध धार्मिक विधी नैवेद्य झाला त्याठिकाणी कुळकार मंदिरात वास्तव्य केल्यानंतर रविवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा कुळ्कार मंदिराजवळ कौल दिल्यानंतर ही तरंगे श्री रवळनाथ मंदिराजवळील पारंपारिक जागेत आल्यानंतर उपस्थित भाविकांनी  अवसारी कौल दिला  .पहिला कौलरविवार 13 ऑक्टोबर  सकाळी 8.30 वा झाला . त्यानंतर 9.30 वा होणाऱया दुसऱया कौलाच्या वेळी भुते काढली ,इतर पारंपारिक विधी झाली त्यानंतर श्री रवळनाथ 11.30 वा शेवटचा अवसारी कौल झाल्यानंतर उत्सवाची सांगता करण्यात आली .  श्री भूमिका वेताळ देवस्थानच्या सर्व  महाजन ,भाविक ,दर्यावर्दी भ?dतगणांनी देवदेवतांचा  कौल  घेण्यास गर्दी केली होती .

Related posts: