|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात 

प्रतिनिधी/ बेळगाव

श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज यांच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अनगोळ, भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश पोतदार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब अनगोळकर, महिला अध्यक्षा भारती केसरकर, विश्वस्त- सुभाष अंगडी, काशीनाथ कुढळे, सचिव मधुसुदन किनारी, शुभांगी देवलापूरकर, उपाध्यक्ष सुभाष बाळेकुंदी, श्रीधर कुढळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सरुवात करण्यात आली. यावेळी महिला व लहान मुले असे दोन गट करून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर सर्वम मधुरम मेलोडीज यांचा संगीताचा कार्यक्रम झाला. अशोक मुरकुंबी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

यावेळी गजानन हणमशेट, सोमेश्वर नाकाडी, सतीश अनगोळकर, के. आर. मालशेट, शीला बिडीकर, शितल कुडतुरकर, अक्षता कलघटगी, निर्मला कलघटगी, रजनी मुरकुंबी, अश्विनी कलघटगी, वर्षा सटवाणी, वंदना मालशेट, राधिका कोरगावकर, जयश्री हणमशेट, अंजली किणारी, सुनीता हणमशेट, उज्ज्वला बैलूर, राधिका कलघटगी, वासंती हणमशेट आदीसह समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: