|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ऐकावे ते नवलच : शिवसेना उमेदवाराला चक्क काँग्रेसचा पाठींबा

ऐकावे ते नवलच : शिवसेना उमेदवाराला चक्क काँग्रेसचा पाठींबा 

तरुण भारत ऑनलाइन टीम /विटा

निवडणुकीच्या धामधुमीत काय वार्ता कानी पडेल सांगता येत नाही. सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये आगळेच घडले आहे. इथे शिवसेनेचे उमेदवार आमदार अनिल बाबर यांना चक्क काँग्रेसने पाठींबा दिला आहे.

शिवसेना उमेदवार आमदार अनिल बाबर यांना खानापूर तालुका काँग्रेस चा जाहीर पाठिंबा खानापूर तालुका अध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी देऊ केला. काँग्रेस कमिटीतच केला पाठिंबा जाहीर करून बाबर यांचा सत्कारही करण्यात आला. या मतदार संघात काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी पक्षत्याग करून अपक्ष उमेदवारी केली आहे.

Related posts: