|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews » आयोध्या : राम जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होण्याची शक्यता

आयोध्या : राम जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होण्याची शक्यता 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना 17 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, एक दिवस आगोदरच दोन्ही पक्षांचा युक्तीवाद संपण्याची शक्यता आहे. आजचा सुनावणीचा हा सलग 40 वा दिवस आहे. दोन्ही पक्षांना तीन तासांचा वेळ देण्यात आला आहे. तसेच दोन्ही पक्षकारांना युक्तीवादासाठी प्रत्येकी 45 मिनिटे देण्यात येणार आहेत. या युक्तीवादाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याने अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेतेसाठी 200 शाळा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

काल झालेल्या सुनावणी दरम्यान अयोध्येतील राम जन्मभूमीच्या जागेवर मशीद बांधण्याची बाबराने केलेली ऐतिहासिक चूक होती. हिंदूंची पुरातन काळापासूनची श्रद्धा लक्षात घेऊन, त्या वादग्रस्त जागेवरील हिंदूंचा हक्क मान्य करून ती चूक सुधारण्याची गरज आहे, असे आग्रही प्रतिपादन हिंदू पक्षकारातर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आले होते.

Related posts: